📘 AI युग — App कसे वापरायचे?

दिवाळी अंक वाचण्यासाठी फक्त ५ सोप्या पायऱ्या. कोणतीही तांत्रिक माहिती लागत नाही.

या पानात:
  1. App बसवा (Android) — किंवा थेट वेबसाइटवर वाचा
  2. भेट कार्डावरचे दोन QR — कशासाठी?
  3. वापरकर्तानाव आणि पासवर्ड कुठे मिळतात? (ई-मेल Spam मध्ये असू शकतो!)
  4. लॉगिन करा
  5. पासवर्ड बदला आणि अंक वाचा / ऐका

१App बसवा

Android मोबाईल असेल तर:

  1. मोबाईलमधले Play Store (रंगीत त्रिकोणाचे चिन्ह) उघडा.
  2. वरच्या शोध-पट्टीत AI Yug Diwali असे लिहा.
  3. “AI युग — विशेष दिवाळी अंक” दिसेल → हिरवे Install बटण दाबा.
  4. बसल्यावर Open दाबा.

iPhone किंवा संगणक असेल तर:

App ची गरज नाही. Chrome / Safari मध्ये app.aiyugdiwali.com उघडा — तिथेच वाचा आणि ऐका.

💡 Play Store मध्ये App सापडले नाही, तर www.aiyugdiwali.com/download.html वरून थेट App (APK) घेता येते.
🔍 AI Yug Diwali
🪔
AI युग — विशेष दिवाळी अंक
AI Yug
Install 👆

२भेट कार्डावरचे दोन QR — कशासाठी?

तुम्हाला अंक भेट मिळाला असेल, तर कार्डावर दोन चौकोनी QR आहेत. दोन्ही वापरायची गरज नाही — एक पुरे.

  • डावा QR — “App घ्या”: स्कॅन केला की थेट Play Store मधले App उघडते. Android मोबाईलसाठी.
  • उजवा QR — “थेट वाचा”: App न बसवता वेबसाइटवर अंक उघडतो. iPhone, संगणक किंवा जागा कमी असलेल्या मोबाईलसाठी.

QR कसा स्कॅन करायचा?

  1. मोबाईलचा Camera उघडा (फोटो काढायचा).
  2. कॅमेरा QR वर धरा — फोटो काढायचा नाही.
  3. पडद्यावर एक दुवा (link) येईल — त्यावर बोटाने टिचकी मारा.
💡 Camera मध्ये दुवा आला नाही, तर Google Lens वापरा किंवा WhatsApp चा कॅमेरा उघडून QR वर धरा.
📷 कॅमेऱ्याने स्कॅन करा
App घ्याAndroid · Play Store
थेट वाचाApp शिवाय · वेबसाइट

३वापरकर्तानाव आणि पासवर्ड कुठे मिळतात?

  • अंक भेट मिळाला असेल तर — भेट कार्डावरच “तुमचे लॉगिन” या चौकटीत.
  • स्वतः पैसे भरून घेतला असेल तर — पैसे भरल्यावर लगेच पडद्यावर दिसतात. त्याच वेळी स्क्रीनशॉट घ्या किंवा “WhatsApp वर स्वतःला पाठवा” हे बटण दाबा. तेच ई-मेलवरही येतात.
⚠ ई-मेल Inbox मध्ये दिसत नाही? तो बहुधा Spam मध्ये गेला आहे. आमचा पत्ता नवा असल्यामुळे Gmail तो कधी कधी Spam मध्ये ठेवतो.

Gmail मध्ये Spam कसा पाहायचा?

  1. Gmail उघडा → डावीकडच्या वरच्या ☰ तीन रेषांवर टिचकी.
  2. यादी खाली सरकवा → Spam (किंवा “स्पॅम”) वर टिचकी.
  3. “AI युग” किंवा ank@aiyugdiwali.com कडून आलेला मेल उघडा.
  4. वरती Report not spam (“स्पॅम नाही”) दाबा — पुढचे मेल Inbox मध्ये येतील.
💡 वरच्या शोध-पट्टीत aiyug असे लिहूनही मेल लगेच सापडतो.
Gmail
📥 Inbox
⭐ Starred
📤 Sent
⚠ Spam 👈
AI युग आज
🪔 तुमचे लॉगिन तयार आहे
वापरकर्तानाव: aiyug_…
Report not spam

४लॉगिन करा

  1. App (किंवा app.aiyugdiwali.com) उघडा.
  2. वापरकर्तानाव टाका — ते aiyug_ ने सुरू होते, उदा. aiyug_sunita2.
  3. पासवर्ड जसाच्या तसा टाका — लहान/मोठी अक्षरे आणि अंक तसेच.
  4. अंक उघडा बटण दाबा.
💡 ई-मेल किंवा WhatsApp मधून Copy करून चिकटवले (Paste) तर चूक होत नाही. सुरुवातीला/शेवटी जागा (space) राहू देऊ नका.
🔒 एक लॉगिन = एक मोबाईल. दुसऱ्या मोबाईलवर लॉगिन केले तर पहिल्यावर अंक बंद होतो. घरच्यांसाठी वेगळा अंक भेट द्या.
🪔
AI युग
विशेष दिवाळी अंक २०२६
वापरकर्तानाव
aiyug_sunita2
पासवर्ड
••••••••
अंक उघडा 👆
पासवर्ड विसरलात?

५पासवर्ड बदला आणि अंक वाचा / ऐका

  • पासवर्ड बदला: App मध्ये खाली उजवीकडे “तुम्ही” → “पासवर्ड बदला”. तुम्हाला लक्षात राहील असा नवा पासवर्ड ठेवा.
  • पासवर्ड विसरलात? लॉगिनच्या पानावर “पासवर्ड विसरलात?” दाबा — ई-मेलवर नवा पासवर्ड येईल.
  • वाचा: “अंक” मध्ये पुस्तकासारखी पाने उलटा; “विभाग” मध्ये आवडीचा विषय निवडा.
  • ऐका: लेखातील 🔊 बटण दाबा — लेख वाचून दाखवला जातो.
  • अक्षरे मोठी: “तुम्ही” → “अक्षरांचा आकार”.
  • स्पेशल: व्यंगचित्रे, शॉर्ट फिल्म, 🧩 शब्दकोडी, 🔮 राशीभविष्य.

🙋 तरीही अडचण आली?

आम्हाला WhatsApp करा — स्क्रीनशॉट पाठवलात तर लगेच मदत करू.
💬 93231 17704 · 98692 81034 · 91367 81034
📧 aidiwali2026@gmail.com

ही माहिती पुन्हा पाहण्यासाठी: www.aiyugdiwali.com/madat.html