AI युगविशेष दिवाळी अंक २०२६

ANDROID APP

दिवाळी अंक आता मोबाईलवर — पुस्तकासारखा

पाने उलटत वाचा, लेखकाच्या आवाजात ऐका, खिडकी चित्रांचे सरप्राईज उघडा, हलती व्यंगचित्रे आणि रील्स तिथल्या तिथे पाहा — AI युग विशेष दिवाळी अंक २०२६ एका App मध्ये.

AI युग App
AI युग दिवाळी अंक २०२६Android ५.० किंवा पुढील · मराठी
App उतरवा (APK)
आवृत्ती — आकार — अद्ययावत —

Google Play Store वर App लवकरच येत आहे. तोपर्यंत इथून थेट उतरवा — हे आमचे स्वतःचे, स्वाक्षरी केलेले अधिकृत App आहे.

iPhone / iPad वापरता? iPhone साठी App अजून नाही. Safari मध्ये app.aiyugdiwali.com उघडा आणि Share → Add to Home Screen करा — App सारखेच चिन्ह होम स्क्रीनवर येईल.
AI युग — विशेष दिवाळी अंक २०२६, मुखपृष्ठ
QR — मोबाईलवर उघडा मोबाईलने स्कॅन करा

App मध्ये काय आहेवाचा · ऐका · पाहा

📖पुस्तकासारखा अंक

मुखपृष्ठावर टॅप करा — पाने खरी उलटतात, आवाजासह. कोणत्याही विभागात एका टॅपवर.

🎧अभिवाचन

लेख लेखकाच्या / कलाकाराच्या आवाजात; ऐकत असलेले वाक्य पानावर उजळते.

🪟खिडकी चित्रे

चित्रावर टॅप करा — पान उलटते आणि खरे काय ते दिसते.

✏️हलती व्यंगचित्रे

व्यंगचित्र हलताना पाहा; दोन बोटांनी मोठे करून बारकावे पाहा.

🎬रील्स व मुलाखती

YouTube वर न जाता App मध्येच चालतात.

🌙वाचनाची सोय

अक्षरांचा आकार, रात्रीसाठी गडद पान, जिथे थांबलात तिथून पुढे.

📚AI शब्दकोश

अंकातील तांत्रिक शब्द सोप्या मराठीत.

❓प्रश्नमंजूषा

वाचलेलं किती लक्षात राहिलं ते तपासून पाहा.

App कसे install करायचेपहिल्यांदा एकच मिनिट लागतो

APK उतरवा

Android फोनवर Chrome मध्ये हे पान उघडा आणि “App उतरवा (APK)” दाबा. “ही फाइल धोकादायक असू शकते” असे विचारले तर तरीही उतरवा (Download anyway) निवडा.

फाइल उघडा

उतरवणे पूर्ण झाल्यावर सूचनेतील Open दाबा, किंवा Files → Downloads मध्ये aiyug-diwali.apk वर टॅप करा.

परवानगी द्या (एकदाच)

“अज्ञात App install करण्याची परवानगी नाही” असे आले तर Settings दाबा → Allow from this source / या स्रोतातून परवानगी द्या चालू करा → मागे या.

Install करा

Install दाबा. Google Play Protect “App ओळखीचे नाही” असे सांगू शकते — ते Play Store वर अजून नसल्यामुळे. More details → Install anyway निवडा.

प्रवेश करा

App उघडा आणि नोंदणीच्या वेळी ई-मेलवर आलेल्या ई-मेल व पासवर्डने प्रवेश करा. अंक वाचायला सुरुवात — मुखपृष्ठावर टॅप करा!

सुरक्षिततेबद्दल: APK फक्त याच संकेतस्थळावरून (www.aiyugdiwali.com) उतरवा. WhatsApp वर पुढे पाठवलेली फाइल वापरू नका — ती बदललेली असू शकते. App तुमचे contacts, फोटो किंवा location मागत नाही.

📱 एक खाते — एक फोन

  • अंक तुमच्या एका फोनवर उघडतो.
  • नवीन फोनवर प्रवेश केला की जुन्या फोनवरचा प्रवेश आपोआप बंद होतो.
  • पासवर्ड विसरलात किंवा फोन बदलताना अडचण आली? खाली दिलेल्या नंबरवर WhatsApp करा.

🔄 नवीन आवृत्ती

  • लेख, विभाग आणि बदल App उघडताच आपोआप येतात — पुन्हा install करावे लागत नाही.
  • App ची नवीन आवृत्ती आली तर याच पानावरून उतरवून install करा; तुमचे खाते आणि वाचन तसेच राहते.

नेहमीचे प्रश्न

“App not installed” असे येते

फोनमध्ये जागा आहे का ते पाहा (किमान २०० MB मोकळी). आधीची एखादी वेगळ्या स्वाक्षरीची प्रत असेल तर ती uninstall करून पुन्हा install करा. Android ५.० पेक्षा जुना फोन असेल तर App चालणार नाही — app.aiyugdiwali.com वर वाचा.

Play Protect App थांबवते

App अजून Play Store वर नाही म्हणून Google ते ओळखत नाही. More details → Install anyway निवडा. Play Store वर आल्यावर हा इशारा येणार नाही.

iPhone वर App आहे का?

अजून नाही. iPhone / iPad वर Safari मध्ये app.aiyugdiwali.com उघडा — सगळा अंक तिथे वाचता येतो. Share → Add to Home Screen केले की App सारखे चिन्ह मिळते.

संगणकावर वाचता येईल का?

हो — app.aiyugdiwali.com वर त्याच खात्याने. App फक्त Android फोनसाठी आहे.

अंकाचे खाते कसे मिळवायचे?

मुख्य पानावर नोंदणी करा. पासवर्ड ई-मेलवर येतो; तोच App मध्ये वापरा.

मदत हवी?

📧 aidiwali2026@gmail.com · 💬 WhatsApp: +91 93231 17704 · +91 98692 81034 · +91 91367 81034