🪔 AI युग दिपस्तंभ विचाराचा

अटी व शर्ती

शेवटचा बदल — १४ सप्टेंबर २०२६

हे संकेतस्थळ वापरून किंवा अंक Book करून तुम्ही या अटी मान्य करता. त्या सोप्या आहेत — अंक तुमच्या वैयक्तिक वाचनासाठी आहे, आणि तुम्ही पाठवलेले साहित्य तुमचेच राहते.

१. आम्ही कोण

हे संकेतस्थळ Intrepidians चालवते. आम्ही AI युग — विशेष दिवाळी अंक २०२६ प्रकाशित करतो. या पानावर "आम्ही" म्हणजे Intrepidians, "तुम्ही" म्हणजे हे संकेतस्थळ वापरणारी व्यक्ती, आणि "अंक" म्हणजे हा दिवाळी अंक — डिजिटल, छापील किंवा App मधील.

२. खाते

App मध्ये एक वर्गणी, एक उपकरण.
पहिल्यांदा ज्या फोनवर प्रवेश होतो, त्यालाच खाते बांधले जाते. फोन बदलला असेल तर आम्हाला कळवा — आम्ही ते मोकळे करून देऊ. संकेतस्थळावर ही मर्यादा नाही, तिथे एका वेळी एकच प्रवेश चालतो.

३. अंकाचा वापर

वर्गणी घेतल्यावर तुम्हाला अंक वैयक्तिक वाचनासाठी वापरण्याचा हक्क मिळतो.

हे चालेल

हे चालणार नाही

यांपैकी काही आढळल्यास खाते बंद केले जाईल आणि परतावा मिळणार नाही.

४. तुम्ही पाठवलेले साहित्य

अंकासाठी लेख, कथा, कविता, चित्रे किंवा चित्रफिती पाठवताना या गोष्टी लागू होतात.

तुमचा हक्क तुमचाच राहतो. आम्ही तुमच्या कलाकृतीची मालकी घेत नाही. आम्हाला फक्त ती या अंकात, संकेतस्थळावर आणि App मध्ये प्रकाशित करण्याचा हक्क मिळतो — नाव नेहमी देऊन.

साहित्य पाठवताना तुम्ही हे मान्य करता:

संपादकीय मंडळाला मजकुरात भाषिक व मांडणीविषयक बदल करण्याचा अधिकार आहे. आशय बदलणारा बदल असेल तर तुमची संमती घेतली जाईल.

साहित्य निवडले जाईलच याची हमी नाही. न निवडलेले साहित्य परत केले जात नाही.

५. स्पर्धा

६. किंमत आणि payment

परतावा आणि रद्दीकरणासाठी परतावा धोरण पहा. छापील अंक पाठवण्यासाठी पाठवणी धोरण पहा.

७. अंकातील मजकूर

अंकातील लेख हे लेखकांची मते आहेत. ती संपादकीय मंडळाची किंवा Intrepidians ची अधिकृत भूमिका असतीलच असे नाही.

अंकात दिलेली माहिती सामान्य वाचनासाठी आहे. ती व्यावसायिक, कायदेशीर, वैद्यकीय किंवा आर्थिक सल्ला नाही. त्यावर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी आमची नाही.

८. सेवेतील खंड

संकेतस्थळ आणि App सतत चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो, पण देखभाल, तांत्रिक अडचण किंवा आमच्या नियंत्रणाबाहेरील कारणांनी सेवा काही काळ बंद राहू शकते. अशा खंडासाठी नुकसानभरपाई दिली जाणार नाही.

अंक तुमच्या उपकरणावर offline उपलब्ध असतो, त्यामुळे सेवा बंद असतानाही वाचन थांबत नाही.

९. जबाबदारीची मर्यादा

कोणत्याही परिस्थितीत आमची एकूण जबाबदारी तुम्ही भरलेल्या रकमेइतकीच राहील. अप्रत्यक्ष नुकसान, गमावलेला नफा किंवा माहितीच्या हानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.

१०. बदल

या अटींत बदल झाल्यास या पानावरची तारीख बदलेल. मोठा बदल असल्यास नोंदणीकृत वाचकांना ई-मेलने कळवले जाईल. बदलानंतर संकेतस्थळ वापरणे म्हणजे नव्या अटी मान्य करणे.

११. लागू कायदा

या अटींवर भारतीय कायदा लागू होईल. कोणताही वाद ठाणे, महाराष्ट्र येथील न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात येईल.

प्रश्न असल्यास

Intrepidians

C001, The Panvelkar Royal Square, Opp. Tulsi Vihar,
Next to Ghorpade Maidan, Hendre Pada,
बदलापूर (पश्चिम), ठाणे, महाराष्ट्र

ई-मेल — contact@intrepidians.com
WhatsApp — +91 93231 17704 · +91 98692 81034 · +91 91367 81034
संकेतस्थळ — www.aiyugdiwali.com

सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते संध्याकाळी ७