तांत्रिक शब्दांशिवाय AI समजावून सांगणारे लेख. यंत्र "शिकतं" म्हणजे नेमकं काय, आणि ते माणसाच्या विचारापेक्षा कसं वेगळं आहे.
🎓
AI आणि शिक्षण
वर्गात, अभ्यासात आणि परीक्षेत AI कसा वापरला जातोय. शिक्षकांचे अनुभव, बदललेल्या पद्धती, आणि नव्या अडचणी.
👨🎓
विद्यार्थी आणि AI
विद्यार्थ्यांच्या नजरेतून — गृहपाठ, प्रकल्प, स्पर्धा परीक्षा. मदत कुठे संपते आणि कॉपी कुठे सुरू होते?
💼
AI आणि रोजगार करिअर
कोणती कामं बदलतायत, कोणती नव्याने तयार होतायत. नोकरी गमावलेल्यांचे आणि नवी दिशा मिळालेल्यांचे अनुभव.
📈
AI आणि व्यवसाय उद्योजकता
छोट्या व्यवसायात AI — दुकान, कारखाना, सेवा. खर्च किती आला, फायदा किती झाला, आणि काय फसलं.
🌾
शेती आणि AI
पाणी, फवारणी, हवामान अंदाज, बाजारभाव. शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव — यशाचेही आणि अपयशाचेही.
🗺️
महाराष्ट्र आणि AI
राज्यातले उपक्रम, धोरणं, संस्था आणि माणसं. महाराष्ट्र या बदलात कुठे उभा आहे?
🔤
AI आणि मराठी भाषा
यंत्राला मराठी किती येते, कुठे अडते. भाषांतर, लिप्यंतरण, आवाज — आणि मराठी मजकूर डिजिटल करण्याचं काम.
🎨
AI आणि कला सर्जनशीलता
चित्र, संगीत, रचना — यंत्र कलाकार होऊ शकतं का? कलाकारांचे अनुभव आणि त्यांच्या मनातली अस्वस्थता.
🎬
AI आणि सिनेमा
पटकथा, VFX, डबिंग, आवाजाची नक्कल. मराठी सिनेमात AI कुठवर पोहोचला आहे?
⚖️
समाज आणि नैतिकता
पूर्वग्रह, भेदभाव, जबाबदारी. यंत्रानं चूक केली तर दोष कोणाचा — बनवणाऱ्याचा की वापरणाऱ्याचा?
🔒
Privacy, Deepfake आणि धोके
बनावट आवाज व चित्रफिती, फसवणूक, माहितीची चोरी. ओळखायचं कसं आणि टाळायचं कसं.
🚀
AGI आणि भविष्य
पुढच्या दहा वर्षांत काय होईल — आणि काय होणार नाही. अंदाज, आशा आणि अतिशयोक्तीतला फरक.
📋
प्रत्यक्ष अनुभव केस स्टडी
तुम्ही स्वतः AI वापरून काही घडवलं असेल तर तो अनुभव. आकडे, अडचणी आणि शिकलेले धडे यांसह.
स्पेशल विभाग
इथे लेख नव्हे — कलाकृती हव्यात
वरचे विषय लिहिण्यासाठी आहेत. हा विभाग वेगळा — इथे बघायचं,
हसायचं, ऐकायचं. याच चार प्रकारांवर स्पर्धाही आहेत.
✏️व्यंगचित्रे
AI च्या युगावर हसणारं एक चित्र. यंत्र आणि माणूस यांच्यातला विनोद, विरोधाभास किंवा विचार.
🪟खिडकी चित्रे
दोन चित्रे — वरती चौकट कापलेला मास्क, खाली खरे चित्र. खिडकीतून दिसणाऱ्या तुकड्यावरून वाचक काहीतरी ठरवतो. मास्क उघडल्यावर आत वेगळेच निघते — आणि फसल्याचे हसू येते.
📜AI कथा आणि कविता
AI च्या मदतीने लिहिलेल्या, पण कल्पना तुमचीच असलेल्या रचना.
◎AI ने बनवलेले लोगो
AI साधनांनी घडवलेली ब्रँडची ओळख — सोबत तुम्ही काय सांगितलं तेही.
🎞️AI शॉर्ट फिल्म
काही मिनिटांची गोष्ट, पडद्यावर. AI साधनं वापरून बनवलेली.
📱AI रील्स
AI साधनं वापरून बनवलेली, कमीत कमी ५ मिनिटांची, विषयाशी सुसंगत मराठी रील.
🎙️तज्ञांच्या मुलाखती
AI क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्यांशी थेट संवाद. तुम्ही घेतलेली मुलाखतही पाठवता येईल.
🏆 यांपैकी काही प्रकारांवर स्पर्धा आहेत — प्रथम, द्वितीय, तृतीय
आणि उत्तेजनार्थ बक्षिसे. नियम व अटी पाहा →
📄
संपूर्ण माहिती एका फाइलमध्ये
अंकातले विभाग, स्पर्धांचे नियम, लेख पाठवण्याच्या सूचना,
जाहिरातीचे पर्याय आणि संपर्क — सगळे एकत्र. नंतर वाचण्यासाठी
किंवा कोणाला पाठवण्यासाठी.
तुमच्या मनातील शंकांची उत्तरे इथे मिळतील. विषयानुसार गाळणी लावा किंवा प्रश्नावर क्लिक करून उत्तर पाहा.
AI युग — विशेष दिवाळी अंक २०२६ हा कृत्रिम बुद्धिमत्तेला वाहिलेला मराठीतील पहिला विशेषांक आहे. मध्यवर्ती संकल्पना आहे — AI समजून घेऊया: भीती नव्हे, संधी! यात २२ मुख्य विभाग आणि ७ स्पेशल विभाग असून शिक्षण, रोजगार, शेती, व्यवसाय, कला, सिनेमा, नैतिकता आणि भविष्य असे विषय समाविष्ट आहेत.
MS Word (.docx) किंवा Google Docs मध्ये पाठवावा. PDF शक्यतो टाळावे, कारण संपादन करताना अडचण येते.
Font: Unicode Marathi Font
Font Size: 12 – 14
Line Spacing: 1.15 किंवा 1.5
Heading व Sub-heading वेगळे दाखवावेत
लेखाच्या प्रकारानुसार:
लघुलेख: ८०० – १,२०० शब्द
सामान्य लेख: १,५०० – २,५०० शब्द
सखोल लेख: २,५०० – ४,००० शब्द
विशेष लेख: ४,००० – ५,००० शब्द
लेखाचे शीर्षक, लेखकाचे पूर्ण नाव, व्यवसाय/पद, संस्था, शहर, मोबाईल, ई-मेल, ५०–८० शब्दांचा परिचय, लेखकाचा Photograph, लेखातील संदर्भ आणि वापरलेल्या छायाचित्रांचे स्रोत.
होय, तुम्ही एकापेक्षा जास्त लेख पाठवू शकता. मात्र प्रत्येक लेख स्वतंत्र फाइलमध्ये आणि स्वतंत्र माहितीसह पाठवावा. संपादकीय मंडळ प्रत्येक लेखाचे स्वतंत्रपणे परीक्षण करेल.
३० ऑक्टोबर २०२६ ही अंतिम तारीख आहे. लवकर पाठवलेल्या लेखांना संपादकीय प्रक्रियेत अधिक वेळ मिळतो, त्यामुळे शक्य तितक्या लवकर पाठवावा.
सर्वांचे स्वागत आहे! विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक, संशोधक, उद्योजक, Developers व तंत्रज्ञ, कलाकार व सिनेमाकर्मी, लेखक व पत्रकार — आणि AI मध्ये रस असणारे कोणीही.
नक्कीच! विद्यार्थी आणि AI हा आमच्या प्राधान्य विषयांपैकी एक आहे. तुमचा प्रत्यक्ष अनुभव, project किंवा AI विषयीचे विचार आम्हाला विशेष आवडतील.
हा मराठी दिवाळी अंक असल्याने लेख मराठीत असावा. तांत्रिक संज्ञा (उदा. Machine Learning, Deepfake) इंग्रजीत लिहिणे पूर्णपणे चालेल — त्या मराठीत भाषांतरित करण्याची गरज नाही.
मानधनाबाबतची माहिती संपादकीय मंडळाकडून स्वतंत्रपणे कळवली जाईल. अधिक तपशीलासाठी aidiwali2026@gmail.com वर संपर्क साधा.
सर्व प्राप्त लेखांचे संपादकीय मंडळाकडून परीक्षण केले जाते. निर्णय झाल्यावर तुम्ही दिलेल्या ई-मेल किंवा मोबाईल वर कळवले जाईल.
संपादकीय मंडळाला लेख स्वीकारण्याचा/नाकारण्याचा, आवश्यक संपादकीय बदल करण्याचा, लांबी कमी-जास्त करण्याचा, शीर्षक बदलण्याचा, भाषिक सुधारणा करण्याचा आणि योग्य विभागात प्रकाशित करण्याचा अधिकार राहील. लेख स्वीकारला म्हणजे तो जसाच्या तसा प्रकाशित होईलच असे नाही.
खालील प्रकारचे लेख स्वीकारले जाणार नाहीत:
Copyright मजकुराची नक्कल किंवा Plagiarized Content
खोटी किंवा पडताळणी न केलेली माहिती
द्वेषपूर्ण किंवा आक्षेपार्ह मजकूर
राजकीय किंवा धार्मिक प्रचारात्मक मजकूर
व्यक्ती/संस्थेची बदनामी करणारा मजकूर
फक्त AI-generated व तथ्य पडताळणी नसलेला मजकूर
जाहिरात स्वरूपाचा लेख
AI चा वापर मदतीसाठी करणे चालेल, पण लेख पूर्णपणे AI-generated आणि तथ्य पडताळणी नसलेला असेल तर तो स्वीकारला जाणार नाही. लेखात तुमचे स्वतःचे विचार, अनुभव आणि पडताळलेली माहिती असणे आवश्यक आहे.
या विषयांना विशेष प्राधान्य दिले जाईल:
मराठी आणि AI
महाराष्ट्र आणि AI
विद्यार्थी आणि AI
AI आणि Future Jobs
AI आणि Creative Industry / Cinema
AI Ethics
प्रत्यक्ष AI अनुभव / Case Study
AI वापरून केलेले innovative projects
तुम्हाला हवा तो संच निवडून त्याखालचे 'हा संच Book करा' बटण दाबा. तुमचे नाव, ई-मेल आणि मोबाईल भरा, plan निवडा आणि पेमेंट पूर्ण करा.
एकच सोपा पर्याय: Interactive eBook — ₹199 (App आणि संकेतस्थळावर संपूर्ण अंक). हवी असल्यास अंकासोबत AI युग टी-शर्ट — ₹450 घरपोच मिळते.
Payment यशस्वी झाल्यावर तुम्हाला लगेच स्क्रीनवर आणि ई-मेलवर मिळेल:
Payment Receipt
Website साठी Username व Password
iPhone व Android App download links
Login करण्याच्या step-by-step सूचना
होय. Android साठी App आहे (aiyugdiwali.com/download.html वरून; Google Play वर लवकरच), आणि iPhone / संगणकावर app.aiyugdiwali.com वर वाचता येतो. Booking नंतर मिळालेल्या credentials ने login करून संपूर्ण अंक offline सुद्धा वाचता येईल.
सर्व २८ विभागांचा संपूर्ण Digital Access, AI मराठी शब्दकोश, Interactive Quiz, App वर offline वाचण्याची सुविधा आणि Advance Bookers ला Priority Access.
Front Inside Cover, Back Inside Cover, Back Cover, Full Page, Half Page, Section Sponsorship, तसेच QR Code व Video Advertisement असे Digital पर्यायही उपलब्ध आहेत.
Platinum Partner: Back Cover + Digital + Special Branding
Gold Partner: Inside Cover / Full Page + QR
Silver Partner: Full Page Advertisement
Associate Partner: Half Page Advertisement
Digital Partner: QR + Website + Digital Promotion
दिवाळी अंक सामान्य जाहिरातीपेक्षा अधिक काळ वाचला आणि जपला जातो. AI व Technology मध्ये रस असलेल्या विद्यार्थी, शिक्षक, Professionals आणि Entrepreneurs पर्यंत तुमचा Brand थेट पोहोचतो.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही?
गार्गीला विचारा किंवा थेट आमच्याशी संपर्क साधा — आम्ही लवकरात लवकर उत्तर देऊ.
Intrepidians ही गेली पंचवीस वर्षे संगणक क्षेत्रात काम करणारी
कंपनी आहे — सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रशिक्षण, संशोधन आणि शिक्षण
या चारही दिशांनी.
या पंचवीस वर्षांत तंत्रज्ञानाच्या अनेक लाटा आम्ही जवळून पाहिल्या —
डेस्कटॉपपासून वेबकडे, वेबवरून मोबाइलकडे, आणि आता कृत्रिम
बुद्धिमत्तेकडे. प्रत्येक वेळी तोच प्रश्न पुन्हा उभा राहिला:
हे नवं तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या भाषेत कोण समजावून सांगणार?
हा अंक त्याच प्रश्नाचं आमचं उत्तर आहे.
💻
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटगरज समजून घेण्यापासून तैनातीपर्यंत
🎓
सॉफ्टवेअर प्रशिक्षण.NET, Java, Python, Angular, React
📊
Data Science प्रशिक्षणML, AI, Pandas, Scikit-learn
☁️
Web HostingDomain, shared, VPS, cloud
📚
शैक्षणिक सामग्री निर्मितीeBooks, व्हिडिओ, LMS, प्रकल्प
🧭
शैक्षणिक सल्लाअभ्यासक्रम नियोजन, संस्थात्मक भागीदारी
कृत्रिम बुद्धिमत्ता ही फक्त इंग्रजी जाणणाऱ्यांची मक्तेदारी राहू नये.
जे तंत्रज्ञान पुढच्या दशकात प्रत्येकाच्या कामावर, शिक्षणावर आणि
रोजच्या जगण्यावर परिणाम करणार आहे, ते मराठीत — सोप्या भाषेत,
प्रामाणिकपणे, अतिशयोक्तीशिवाय — पोहोचवणं.
🔭
आमचं स्वप्न
मराठी माणूस AI चा केवळ वापरकर्ता न राहता तो घडवणारा व्हावा.
शाळेतल्या मुलापासून शेतातल्या शेतकऱ्यापर्यंत प्रत्येकाला हे
तंत्रज्ञान आपलं वाटावं, आणि उद्याची मराठी भाषा-प्रारूपं
आपल्याच हातून तयार व्हावीत.
अंकासोबत पाच स्पर्धा. प्रत्येकात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि
उत्तेजनार्थ अशी बक्षिसे. विजेत्यांच्या कलाकृती अंकात
प्रकाशित होतील आणि प्रमाणपत्र दिलं जाईल.
०१
व्यंगचित्र स्पर्धा
AI च्या युगावर हसणारं एक चित्र. विषय मोकळा — यंत्र आणि माणूस यांच्यातला विनोद, विरोधाभास, किंवा विचार.
प्रथमद्वितीयतृतीयउत्तेजनार्थ
०२
खिडकी चित्रे स्पर्धा
दोन चित्रे — वरती चौकट कापलेला मास्क, खाली खरे चित्र. खिडकीतून दिसणाऱ्या तुकड्यावरून वाचक काहीतरी ठरवतो. मास्क उघडल्यावर आत वेगळेच निघते — आणि फसल्याचे हसू येते.
प्रथमद्वितीयतृतीयउत्तेजनार्थ
०३
AI-Reel स्पर्धा
AI साधनं वापरून बनवलेली, कमीत कमी ५ मिनिटांची आणि विषयाशी सुसंगत मराठी रील.
प्रथमद्वितीयतृतीयउत्तेजनार्थ
०४
लेखन स्पर्धा
अंकासाठी पाठवलेले सर्व लेख, कथा, कविता आणि गाणी — सगळ्यांचा एकत्र विचार होईल.
पूर्णपणे AI-generated आणि स्वतःचा विचार नसलेली प्रवेशिका.
निवड कशी होईल
संपादकीय मंडळ आणि निमंत्रित परीक्षक निवड करतील.
कल्पकता, मराठीपण आणि विषयाशी सुसंगती यांना प्राधान्य.
तांत्रिक सफाईपेक्षा मूळ कल्पनेला जास्त गुण.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
पुरेशा प्रवेशिका न आल्यास एखादी स्पर्धा रद्द होऊ शकते.
हक्क आणि प्रकाशन
कलाकृतीचा हक्क स्पर्धकाकडेच राहील.
अंकात व संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचा हक्क आयोजकांना.
प्रकाशित करताना नाव नेहमी दिले जाईल.
निकाल ई-मेल व WhatsApp ने कळवला जाईल.
प्रत्येक सहभागीला डिजिटल प्रमाणपत्र.
📍 संपर्क साधा
🏢
पत्ता
Intrepidians · iAct Institute
C001, The Panvelkar Royal Square,
Opp. Tulsi Vihar, Next to Ghorpade Maidan,
Hendre Pada, बदलापूर (पश्चिम),
ठाणे, महाराष्ट्र